मी त्यांच्या कडे बघतच राहिलो , कारण मला कधी वाटलच
नव्हत की कुणी मराठी वेक्ती येथे भेटेल . पण आपल्याला वाटण्या न वाटण्याने थोडीच काही घडत असत जे घडत
ते बऱ्याच अनपेक्षित घटनाचा कदाचित लेखा जोखा असतो.
हो मी
अभय ..पण तुम्ही ...? त्या वेळेस माझ्या नजरोतल कुहुतुल स्पष्ट त्यांना जाणवलं असेल.
त्या हसत म्हणाल्या हो मी पुण्याची..आता
तर माझ्या मनातल कुहुतुल आश्चर्यात बदलत होत.
पण तुम्ही मला कसं ओळखता ? तुम्ही मला नावानिशी बोललात ..त्या मुळे माझ्या मनात अनेक यक्ष प्रश्नांनी जन्म घेतला होता.
माझं नाव हर्षदा.. पुढे त्या काही सागणार
असताना तेवढ्यात गीता ने त्यांना तिकडे येणाच्या इशारा केला .. आणि त्या तिकडे निघून गेल्या.
पण माझ्या मनात निर्माण झालेले अनेक प्रश्न मात्र त्या गेल्या मुळे
अनुत्तरित राहिल होते.
कोण बरं असतील त्या ? त्यांना माझं नाव कसं
माहित ?
मी तर कधीच त्यांना भेटलेलो आठवणीत
नाही. आता माझं त्या रांगोळी कडच ध्यान पुर्ण पने दुर्लशीत होयून ते आता या प्रश्नाची उत्तरं शोधायला लागलं होत .पण त्यांच्या
बद्दल मला कसं काही का आठवत नव्हतं.खर तर इतका गजनी मी आयुष्यात कधीच झालो नव्हतो.
थोड्या वेळातच मराठी पोशाखात सजलेली गीता
इथे आली.
Abhay everything ok ?
कदाचित तिने मला गोधळलेलं बघितलं असावं ?
Yes .. मी म्हणालो . पण everything आता मला not ok वाटायला
लागल होत . त्या महिलेला आणखी ही मी त्या गर्दित नजर इकडे तिकडे फिरवत शोधत होतो .पण मला त्या रांगोळीच्या
टेबला वरून कुठेहि
हलता येत नव्हत.
तितक्यात मला दास येताना दिसला .मला ना थोड काम आहे ..लगेच आलो अस
सांगून मी त्यांना त्या रांगोळीच्या टेबल वर बसवलं आणि मी शोधकार्याला सुरवात केली.
बराच वेळ शोधल्यावर मला त्या कॅन्टीन मधे दिसल्या.? मी सरळ त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. आपल बोलन अर्धवटच राहील नाही ....माझ्या कुहुतुलेल्या चेहऱ्यावर बळजबरीची स्माईल होती.
आपण मला कसं काय ओळखता ? आणि मी सरळ मुद्द्याला हात घातला.
त्यांची मंद
स्माईल मला आणखी कोड्यात टाकत होती .ओळख
नाही आपली पण मला माहित आहे तु अभय आहे म्हणून. त्या म्हणाल्या.
पण कसं काय ? मी डोक खाजवत विचारल ?
तू गीता ला ओळखतोस
? मला उत्तराची अपेक्षा असतानी त्यांनी प्रती प्रश्न केला .
हो ..ओळखतो ? त्या
सिनिअर आहेत माझ्या..पण थोड्या अकडू आहेत?
कधी कधी काय होत
जेंव्हा तुम्हाला जवळच कुणी भेटल्या सारख वाटत तेंव्हा अनवधानाने तुम्ही भावनेच्या
भरात मनातल बोलून जाता . आता त्या मराठी परत आपल्या पुण्यातल्या ...आणि अनोळखी
भाषेच्या लोकांत जवळच्या वाटण साहजिक होत आणि माझ्या तोंडून बाकी शब्दांन सोबत "आकडू " हा कडवट शब्द बाणा सारखा निघून गेला .
हो का..... त्या अकडूची मी आई ..!!त्या खूप मोठ्याने हसत म्हणाल्या.
हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच
सरकली...काय म्हणताय ? गीता ची आई आहात तुम्ही पण ती तर तमिळ आहे .. मी म्हणालो ..
मग काय तमिळ मुलीची आई मराठी असू शकत
नाही का ?
असू ..शकते ...पण ..आता तर माझ्या
तोंडातून बाहेर पडणारे शब्द ही मला संपल्या सारखे वाटत होते. भर उन्हात फक्त धंडी भरायची राहिली होती .
अरे तू बरोबर ओळखलस ...खडूसच आहे ती ...त्या
म्हणाल्या .
नाही हो ...चागल्या आ ...अआहेत. माझी मराठी भाष्याच
आता मला आठ्वेनाशी झाली होती.
मी काय लगेचच जायुन सागणार नाही तिला ..तू अस बोलय ते ....त्यांचा मस्करीचा स्वर माझी कॅरिअर चे गणितं बिघडवंताना मला दिसत होता.
मला वाटल घरातच ती अकडू वागते ...ऑफिस मध्ये पण
तसीच का रे ती ?....त्या म्हणाल्या
ऐकना..पुन्हा पुन्हा ते खडूस वैगेरे नका ना म्हणू ........माझ्या भाषेच्या पद्धत मुळे मी बोलून गेलोय...खरच .....मी पुरता गांगरलो होतो.
आता एक एक करत फ्लशबँक चे सीन माझ्या डोळ्या समोरून ....जायला लागले होते.
............... ते फोटोला भांडलेल ही तिला कळलं असणार नक्कीच मग ..तिला मराठी कळत ...की नाही ..आणि कळत असेल तर ती ... बोलली
का नाही कधी .मी तर पुरता आता सैर भैर झालो होतो ..कहाणी मध्ये इतका मोठा ट्विस्ट
येइल अशी स्वप्न कल्पना ही मी केली नव्हती.
गीताला मराठी समजत का ? मी माझ्या डोक्याला हात लावत..
चागला चुंगला केसांचा
भांग परत विस्कटत विचारलं?
तिला समजत थोड - थोड पण समजायला थोडा
वेळ लागतो .ये तिच्या सोबत
कधी घरी म्हणून मंद मस्करीभरी स्माईल त्या निघून गेल्या.. .
कळत पण समजायला थोड वेळ लागतो म्हणजे ? मला कश्याचा कश्यात ताळमेळ लागत नव्हता. गीताची आई मला अश्या कोड्यात बोलून निघून गेली की ..ज्याच उत्तर माझ्या सारख्या सामान्य माणसाला सापडण म्हणजे एखादा दैवी चमत्कारा पेक्षा कमी नव्हतं....