Marathi Kavita ye bhanawar | मराठी कविता ये भानावर | Marathi poetry

  अर्चना बागुल गायकवाड | Archana Bagul Gaikwad |  Archana's Marathi poem |Marathi kavita | Marathi poetry Marathi Kavita  ye bhanawar | मराठी कविता ये भानावर |  ये भानाव मराठी कविता | प्रथा मराठी कविता |

अर्चना बागुल गायकवाड | Archana Bagul Gaikwad |  Archana's Marathi poem |Marathi kavita | Marathi poetry Marathi Kavita  ye bhanawar | मराठी कविता ये भानावर |  ये भानाव मराठी कविता | प्रथा मराठी कविता |

 ये भानावर

थोडंसं जगून बघ स्वतःसाठी  इतरांसाठी रोज जगतेस

इच्छा आकांक्षा मारून सगळ्या दुसऱ्याचाच विचार करतेस

अगं बघ बाहेर डोळे उघडून दुनिया किती मस्त आहे

ये भानावर थोडीशी स्वतःच्याच दुनियेत का व्यस्त आहे?

बघ  स्वतःकडे अशीच होतीस का तू होती तुझीही काही स्वप्ने

मग का विसरली स्वतःला जखडून सारी बंधने

बाबांचा ग गर्व तू आईची होती राणी तू

भावंडांच्या मैफिलीतली ताई पदाची मानी तू

वेळ गेलेली नाही जाग आता तरी हो तू सज्ज

स्वप्नांना पंख लावून बनव स्वतःच साम्राज्य

उठ लवकर सखे जागून घे छान दाखव तुझ्या कर्तृत्वाने 

तुडवून सारं रान..ll तुडवून सारं रान..ll

  अर्चना बागुल गायकवाड | Archana Bagul Gaikwad |  Archana's Marathi poem |Marathi kavita | Marathi poetry Marathi Kavita  ye bhanawar | मराठी कविता ये भानावर |  ये भानाव मराठी कविता | प्रथा मराठी कविता |

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने