कवितेबद्दल : काही नाती रक्ताची नसतात बन रक्ताच्या नात्यावपेक्षा ज्यास्त घट्ट बनतात .अशीच एक आजी होती दयाळू मायाळू कधी जाणवलच नाही कि ती कुणी परकी आहे इतकी माया ती मला लावायची पण दिवस आज हि मला जसा कि तसा आठवतो .corona time आणि आजी ची एकाकी असफल झुंज .
आजी आणि हॉटेल
पुणे तसं माझ्या साठी नविन नव्हत
औरंगाबाद सुटलं तस पुणे खूप जवळच झालं
इथली माणसं ..ही आपली झाली
आणि मन कधी येथे रमलं कळलंच नाही
तशीच एक पुण्यातली आजी
माझ्या सोसायटीच्या कडेला
एक चहाची छोटीसी तिची हॉटेल होती
आठवत नाही कधी पासून
पण माझी गाडी आपोआप सकाळी तीच्या हॉटेल वर थाबायची
तिच्या हातचे पोहे,उपमा खाल्ल्याशिवाय
सकाळ सुरूच नाही व्हायची.
कधी कधी कामासाठी घाईत असायचो
तिच्या समोरून सरळ निघून जायचो
तेंव्हा जसी आईं आवाज देते लेकराला
तशी मोठ्याने आवाज द्यायची
खरचं राव आईची आठवण यायची
खूप आपुलकीनं म्हणायची
दोन घास खाऊन जा..काम तर होत राहतील
खूप सादी होती ती आजी
म्हणायची मला
तुझ्या सारखाच दिसतो लेक माझा
पण सून आली आणी
तोडून नेल माझ्या काळजाला
खूप दिवस झाले बघितलं ही नाही त्याला
पदरान ओले डोळे पुसायची
आणि पुन्हा कामात गुंतून जायची
तिच्या हातची बाजरीची भाकर मला खूप आवडायची
आजी जेंव्हा करायची
माझी एक भाकर त्यात ज्यस्तीची असायची
आठ्वणी ने सध्याकळी आलो की मला द्यायची
मी उगाच नाही नाही म्हणाय चो
पण त्या भाकरीतली माया
बघून आंदाने भरून जायचो
पण याला ही काळाची नजर लागली
अचानक त्या रात्री
आजी ने माझ्या दाराची कडी वाजवली
मी उठलो ...
ती रडत होती दारावरती
मी तिला विचारलं
तर म्हणीली लवकर डॉक्टरला फोन कर
यांची तब्बेत खूपच बिघडली
मी फोन केला तसा डॉक्टर आला
दुरूनच त्याने करोना असू शकतो म्हणाला ..
आजीचा तर जीव अर्धमेला झाला
तसेच अंबुलन्स ने दवाखाना गाठला
जीव लावणारी आजी बाबा..पण
त्याच्या जवळ ही नाही आल जाता...
बेड भेटला कसा तरी
पण इंजे्शनच्या प्रतिक्षेत बाबा ...तडफत राहिले
सकाळी त्यांच्या शरीराला.. डॉक्टर बॉडी म्हणू लागले
आजी हंबरडा फोडत होती ...
पोटच्या लेकरान वाऱ्यावर सोडल
तेंव्हा नवऱ्याच्याच आधारावर ती जगात होती
शेवटचं बघू द्या डाक्टरला हात जोडू जोडू विनंत्या करत होती
दुसऱ्यादिवशी आजीला शेवटचं पाहिलं
लेका सोबत जाताना ...
त्या नंतर ते हॉटेल तसच बंद आहे
आजीची वाट बघत
एका आजी बाबा ची कहाणी सांगत
कधी ही जेंव्हा ती बाजरीची भाकर बघतो
उर आज ही माझा भरून येतो..
कश्या असतात ना नात्यांच्या त्या अबोल रेशिमगाठी
सदा तरस्त मन त्या मायेसाठी......
सदा तरस्त मन त्या मायेसाठी......
अभय शेजवळ
१४-४-२०२१
औरंगाबाद सुटलं तस पुणे खूप जवळच झालं
इथली माणसं ..ही आपली झाली
आणि मन कधी येथे रमलं कळलंच नाही
तशीच एक पुण्यातली आजी
माझ्या सोसायटीच्या कडेला
एक चहाची छोटीसी तिची हॉटेल होती
आठवत नाही कधी पासून
पण माझी गाडी आपोआप सकाळी तीच्या हॉटेल वर थाबायची
तिच्या हातचे पोहे,उपमा खाल्ल्याशिवाय
सकाळ सुरूच नाही व्हायची.
कधी कधी कामासाठी घाईत असायचो
तिच्या समोरून सरळ निघून जायचो
तेंव्हा जसी आईं आवाज देते लेकराला
तशी मोठ्याने आवाज द्यायची
खरचं राव आईची आठवण यायची
खूप आपुलकीनं म्हणायची
दोन घास खाऊन जा..काम तर होत राहतील
खूप सादी होती ती आजी
म्हणायची मला
तुझ्या सारखाच दिसतो लेक माझा
पण सून आली आणी
तोडून नेल माझ्या काळजाला
खूप दिवस झाले बघितलं ही नाही त्याला
पदरान ओले डोळे पुसायची
आणि पुन्हा कामात गुंतून जायची
तिच्या हातची बाजरीची भाकर मला खूप आवडायची
आजी जेंव्हा करायची
माझी एक भाकर त्यात ज्यस्तीची असायची
आठ्वणी ने सध्याकळी आलो की मला द्यायची
मी उगाच नाही नाही म्हणाय चो
पण त्या भाकरीतली माया
बघून आंदाने भरून जायचो
पण याला ही काळाची नजर लागली
अचानक त्या रात्री
आजी ने माझ्या दाराची कडी वाजवली
मी उठलो ...
ती रडत होती दारावरती
मी तिला विचारलं
तर म्हणीली लवकर डॉक्टरला फोन कर
यांची तब्बेत खूपच बिघडली
मी फोन केला तसा डॉक्टर आला
दुरूनच त्याने करोना असू शकतो म्हणाला ..
आजीचा तर जीव अर्धमेला झाला
तसेच अंबुलन्स ने दवाखाना गाठला
जीव लावणारी आजी बाबा..पण
त्याच्या जवळ ही नाही आल जाता...
बेड भेटला कसा तरी
पण इंजे्शनच्या प्रतिक्षेत बाबा ...तडफत राहिले
सकाळी त्यांच्या शरीराला.. डॉक्टर बॉडी म्हणू लागले
आजी हंबरडा फोडत होती ...
पोटच्या लेकरान वाऱ्यावर सोडल
तेंव्हा नवऱ्याच्याच आधारावर ती जगात होती
शेवटचं बघू द्या डाक्टरला हात जोडू जोडू विनंत्या करत होती
दुसऱ्यादिवशी आजीला शेवटचं पाहिलं
लेका सोबत जाताना ...
त्या नंतर ते हॉटेल तसच बंद आहे
आजीची वाट बघत
एका आजी बाबा ची कहाणी सांगत
कधी ही जेंव्हा ती बाजरीची भाकर बघतो
उर आज ही माझा भरून येतो..
कश्या असतात ना नात्यांच्या त्या अबोल रेशिमगाठी
सदा तरस्त मन त्या मायेसाठी......
सदा तरस्त मन त्या मायेसाठी......
१४-४-२०२१
Related Topics
आजी आणि हॉटेल | आजी आणि आजोबा | corona marathi kavita | मराठी कविता आजी |marathi kavita grand mother
Tags:
Marathi kavita