मराठी कविता नातं | मराठी कविता प्रेमाच्या | sad marathi kavita |emotional marathi kavita

 मराठी कविता नातं | मराठी कविता  प्रेमाच्या | sad marathi kavita | Sad Marathi kavita on love | sad marathi poem on love | emotional marathi kavita |marathi relations kavita |emotional marathi kavita


जेंव्हा आपण मनापासून कुणाची काळजी घेतो आणि आपल मानतो तेंव्हा समोरचा वेक्ती हि आपल्याला आपल मानून तितकाच प्रेम देईल हि अपेक्षा कित्तेकदा अपयशी ठरते आणि मन तुटून जात . आमच्या सारख्या माणसांना लागत तरी काय फक्त दोन शब्द प्रेमाचे आणि त्या साठी हि तरसाव लागत असेल तर त्या नात्याला अर्थच काय उरतो .

हो ..मानतो मी काहींचा स्वभाव असतो पण तो स्वभाव खूप भाव खायून नाही जात ..आणि नात टिकवण हे फक्त एकाच काम असत का ? . स्वभाव नावाचा मुखोटा ..आणखी किती दिवस ...तुम्हाला वाचवत राहील एक दिवस नक्की येईल तुम्हाला जीवापाड जपणारी ती वेक्ती इतकी दूर असेल कि दुर्बिण लायून बघायला गेल तरी दिसणार नाही .नातं

सांगुन तुला कधी कळणार हाय..
नात म्हणजे एक शब्द प्रेमाचा,..
दुसर असत तरी काय ...

आपुलकी जिव्हाळा
सुखावतो मनाला
आज तोच निघाला ..
त्यालाच शोधायला...
शोध अवघड असला जरी , त्याचा हट्ट हाय,,
नात म्हणजे एक शब्द प्रेमाचा,..
दुसर असत तरी काय ...

तुझे तर शब्दच  मुके
जणू माझीच वाट चुके
या  निशब्द वाटेवर
खूप आहे अंधार , दाट आहे धुके
तरी त्या वाटेवर एकटाच बोलत चालणार हाय....
नात म्हणजे एक शब्द प्रेमाचा,..
दुसर असत तरी काय ...

शब्दांच्या भावना
मी पहिल्या उदास होताना
देवाने अनलिमिटेड टॉक टाईम दिला
पण बघितलं मी तो ही सेव करताना .....
तरी वाट  शब्दांची मी बघणार हाय ..
नात म्हणजे एक शब्द प्रेमाचा,..
दुसर असत तरी काय ...

किती सोपं असत ignor करण
सहज हसून विषय बदलणं
बिझि तर सगळेच असतात
पण ती गंम्मतच वेगळी
बिझी असतांना ही  बोलण...
ते समजायला ...मन असावं अस
जशी दुधावरची साय
नात म्हणजे एक शब्द प्रेमाचा,..
दुसर असत तरी काय ...
दुसर असत तरी काय.........🤔🤔🤔
                             

                                     अभय शेजवळ

 मराठी कविता नातं | मराठी कविता  प्रेमाच्या | sad marathi kavita | Sad Marathi kavita on love | sad marathi poem on love | emotional marathi kavita |marathi relations kavita |emotional marathi kavita| Abhay Shejwal poem 

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने