परिचय एका नव्या प्रवासाचा - मराठी कथा

जीवनात खूप काही गोष्टी घडत असतात ,काही आपण लक्षात ठिवतो काही विसरून जातो . काही खास गोष्टी मित्रान सोबत शेअर करतो . 


अशीच माझी एक छोटी सी गोष्ट मी घेयून येतोय . सगळीच एका वेळेत सागून टाकावी अशी ती गोष्ट सांगायला लागलो कि भान राहणार नाही पण ३० दिवसांचा हा प्रवास खूप मनोरंजक आहे आणि तो एकदम सागून त्यातल्या गमतींवर - त्यातल्या त्या कधी न विसरता येणाऱ्या क्षणांवर अन्याय केल्या सारख होईल म्हणून या गोष्टीचे ३० भाग एक एक तुमच्या समोर घेयून येण्याच मी ठरवलं. तर ती गोष्ट सुरु होते पुण्यापासून खूप दूर असलेल्या बँगलोर मधून ......

बँगलोर मधल्या कंपनी मध्ये नवीन नोकरी जॉइन करण्या साठी मी इकडे आलो होतो . तीस दिवसांची ट्रेनिंग मला बंगलोर मध्ये पूर्ण करून पुन्हा पुण्याला जायचं होत . ट्रेनिंग पटकन आटपून पुणे गाठायचं असाच विचार करून मी येथे अनोळखी भाष्या बोलणाऱ्या प्रदेशात निमूट पणे दाखल झालो होतो . तिथेच अचानक ती भेटली, नाव गीता पण तिचा इतकासा परिचय देन योग्य होणार नाही . ती माझी तिथली सीनिअर आणि तीच माझं तीस दिवसांच ट्रेनिंग इन्चार्ज. साधारण सत्तावीस ते तीस वय असलेली तामिळ असलेली सफेद आडवा गंध लावेला , लांब असलेल्या केसांमध्ये मोगऱ्याचा गजरा अडकवलेला , डोळ्यावरचा चष्मा जरा खाली सरकावलेला सावळीशी पण स्मार्ट , कंपनीच्या पंजाबी ड्रेस मध्ये थोडी अकडून उभी होती .हातात असलेल्या पेनाला कानात टाकत तामिळ मध्ये काही तरी स्वतःशीच पुटपुटत होती.



Hi ma'am i am abhay . अस माझं दोनदा सांगून झालं होत पण ती माझ्या कडे दुर्लक्षच करत होती.आणि हटकून दुर्लक्ष करणारी मानस मला अजिबात आवडत नाहीत म्हणून त्या वेळेस अस वाटल उगाच इतक्या लांब आलोय इथली लोक आपल्या सद्या सुध्या स्वभावाला पचणारी नाहीत.मी तसाच माझ्या सर्टिफिकेट ची फाईल घेऊन तिच्या समोर उभा होतो.पण मनात उठलेला गोंधळ तिच्या केसाच्या गजऱ्या सारखा मनोमन विस्कटत चालला होता.....
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने