भाग 1 - बँगलोरचा पहिला भीतीदायक दिवस .....

 काल शनिवारी जे झाल त्या मुळे थोडा गोधळलेला मी नक्कीच होतो. त्यात दोन दिवस नीट झोप झाली नव्हती या शहरातला पहिला दिवस तर अंगावर शहारे आणणारा होता तो दिवस तर मी कसा काढला ते कधीच विसरू शकणार नाही, कारण पुण्यावरून गुरुवारी निघालो आणि १४ तास प्रवासात गेले शुक्रवारी सकाळी पोहचलो. कंपनी ची कॅप मला Majestic Bus Stand वरून नेण्यासाठी आली होती .


पण माझी एक अडचण होती, आता पर्यंत मी सगळेच इंटरव्ह्यू ओन्लाईन दिले होते . कधीच या कंपनी बद्दल ऐकल होत ना कधी कुणी येथे नोकरी करणाऱ्यालाला भेटलो होतो आणि त्यात क्राईम पेट्रोल बघणारा मी अनोळखी लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेयून येथे आलो होतो . त्या मुळे अभय तुझ क्राईम पेट्रोल तर नाही होतंय ना हा विचार मनातून जाताच नव्हता थोडा सा सावध राहत मी कॅप मध्ये बसलो काळासा धिप्पाड दिसणारा वेक्ती मनीकंटा त्याच नाव तो ertiga car घेयून मला न्यायला आला होता .....त्याची ती धिप्पाड शरीररुस्ती माझ्या शंकेला आणखी वाढवत होती. मी बसलो आणि गाडी सुरु झाली याला मात्र थोडाफार हिंदी समजत होत. कारण मी पुण्यावरून निघताना फोन वर याच्याशी माझ बऱ्याचदा बोलन झाल होत व प्रवासात असताना हा माझ्या लोकेशन ची माहिती हि घेत होता .गाडीत बसताच मी याचा आणि कंपनी चे नंबर घरी whats app करायला विसलो नव्हतो.



कंपनी किधर है पहले उधर चलो , मी म्हणालो .
कंपनी में कल जाना..गेस्ट हाउस बोला म्याडम छोडना.. आज आराम travel ने थका अस. तो काहीस म्हाणाला .माझ्या मनात क्राईम पेट्रोल आणखी ज्यास्तच यायला लागल. हा मला सकाळचे ११ वाजले असताना कंपनी न नेता गेस्ट हाउस वर का नेतोय? काही वेगळा कार्यक्रम नाही ना . मी थोडा जोरातच म्हणालो पहिले कंपनी जायेंगे फिर गेस्ट हाउस. त्याला काही कळल कि नाही पण त्याने मान हलवली आणि मी थोडा निवांत झालो . थोड्या वेळात कार एका जुन्या सोसाईट मध्ये जायुन थांबली . ड्रायवर गाडीतून उतरला आणि माझ
डिक्कीतल समान तो काढू लागला मी पण उतरलो . पण मी एका सोसाईट मध्ये होतो ,मनोमन विचार चालू होता हि कसली कंपनी. ड्रायवर मला त्या सोसाईटतल्या एका रूम वर घेयून गेला. मी त्याच्या मागे मागे गेलो. एका रूम वर “wheel india guest house” असी पाटी लावलेली होती . त्याने रूम उघडून चावी माझ्या हातात दिली आणि म्हणाला. rest today.. मला आधी कंपनी बघायची होती पण मी काय म्हणालो हे त्याला तेंव्हा समजल नसाव ,माझ्या कडे पर्याय नव्हता रूम मध्ये आलो तेंव्हा पर्यंत तो निघून गेला होता. मी रूम मधल्या सगळ्या खोल्या आधी निट चेक केल्या कुठे काही गडबड तर नाही ना ..हा विचार आणखीनच जोरात मनात चालू होता . सगळ नीट बघितल्यावर बेड वर जायुन केंव्हा झोपलो कळलच नाही . प्रवासामुळे कदाचित मी खूप थकलेलो असावो . जेंव्हा जाग आली तेंव्हा सायंकाळचे ५.३० वाजले होते. पुण्यावरून येताना घरून आईने ने आठवणीने दिलेला चिवडा आणि थोड फार फाराळच घेयून आलो होतो .एव्हाना भूक तर लागलीच होती त्यावर तुटून पडलो ...बघता बघता रात्रीचे १० वाजले गेस्ट हाउस वर दुसर कुणीच आल नव्हत मी एकटाच आपल्या शहरापासून खूप दूर ना इथली भाषा कळते ना इथे कुणी माझा नातेबाईक राहतो पूर्ण पणे अनोळखी शहर आणि ज्या कंपनी मध्ये जॉईन करायला आलोय ती कंपनी कुठेय माहित नाही. आणि ज्या लोकांशी माझा संपर्क आला ती हि त्याच कंपनी ची आहेत कि नाही माहित नाही . गेस्ट हाउस मध्ये त्या रात्री मला नीट झोप लागलीच नाही. थोड हि काही वाजल कि जाग यायची आणि या गेस्ट हाउस मध्ये मी एकटाच का? हा विचार मनातून काही केल्या जात नव्हता
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने