कॅन्टीन मध्ये एव्हाना जेवण चालू झाले होते.कंपनी ची कॅन्टीन तसी भरपूर मोठी एका बाजूंला जेवणाची
ताट ठेवलेले होते. आणि शेजारी कॅन्टीनचे कर्मचारी एक एक करून जेवण वाढत होते. दुसर्या बाजूला बसून व्यवस्थित जेवण्यासाठी लोखंडी टेबल आणि खुर्च्या लावलेल्या होत्या. त्यावर बसून कंपनी कर्मचारी जेवण करत होते तर काही कंपनी कर्मचारी जेवणाच्या लाईन मध्ये उभे होते तर काही एक एक करत जेवणची भरलेली प्लेट घेऊन जात होते . इथलं जेवण म्हणजे साऊथ स्टाईल जेवण माझं नशीब इथे बाकी सगळं महाराष्ट्रीयन मिलो न मिळो पण चपाती मात्र मिळते . इथे जवळपास सगळेच भात आणि त्या पासुन बनवलेले पदार्थ खूप आवडीने खातात व माझ्या सारखे चपाती खाणारे खूप कमी असतात. रोज च्या मेनूत सांबर आणि भात तर ठरलेलाच असतो आणि इडली, वडा त्या सोबत एखादी भाजी असते पण का माहित मला सांबर कोणत आणि भाजी कोणती हे कधी कळलच नाही कारण भाजीची व चव जवळपास सांबार सारखीच असते , मला इथ सगळ्यात ज्यात जर काही खायला आवडतं असेल तर दहीत साखर टाकून चपाती आणि चवीला पापड पण काही असो जेवणाची क्वालिटी मात्र उत्तम.
गीता लाईन मध्ये उभी राहिली मी एक दोन जणांना लाईन मध्ये तिच्या मागे उभ
राहून दिलं मग मी ही लाईन मध्ये उभा राहिलो.तसं मी काही घाबरत होतो
अश्यातला प्रकार नाही पण कश्याला उगाच नाही का? गीता आणि
चंद्र्प्पा जेवनाच ताट घेऊन त्यांच्या इलेक्ट्रोप्लेटिंग डिपार्टमेंट कडे निघून गेले , गीता एकटीच समोरच्या
टेबलावर जायुन एकटी जेवण करत होती . मी पण
जेवणच ताट भरून घेतलं आणि विचार करत होतो तिच्या समोर जायुन जेवण कराव की दूर कुठे जेवायला जागा
शोधाव. पण जवळपास सगळीकडे
वेगवेगळ्या डिपार्टमेंटची मानस त्यांच्या त्यांच्या ग्रुप मध्ये बसून मस्त गप्पा मारत
जेवण करत होती. मी नवीन असल्यामुळे अजून
तरी मी कुठला ग्रुप जॉईन केला नव्हता.सगळी कडे नजर फिरवून झाल्यावर विचार आला
सगळेच अनोळखी दिसतायेत त्या पेक्षा गीता थोडी फार ओळखीची पण मी तिला आधीच खूप वैताग दिला होता. काय करावं मला तरी काही कळत नव्हत. शेवटी तिच्या समोरचं मी जेवनाच ताट ठेऊन बसलो . ती एकदम नॉर्मल दिसत होती
.. रागा नंतर कुणी नॉर्मल दिसत असेल तर रागात आहे कि नाही याचा अंदाज बधायला जरा
अवघड ..नाही खूप अवघड जात.
आज का माहित पण
जेवताना ही अवघडल्या सारखं वाटत होत . आपण मराठी मानस हाताने भाकर चुरून खाल्ल्या
शिवाय जेवण झाल अस वाटत नाही. ती दोन चमच्याने वाडासांबार खात होती . आता पर्यंत मी इथे कुठल्या तरी कोपऱ्यात जायुन
बसायचो हातानेच जेवायचो . पण आज गीता समोर तसं जेवलो तर उगाच हसू व्हयाच मानून आज मी हळूच चमचा उचलला आणि जेवायला सुरवात केली.
इतरत्र सगळे गप्पा मारत जेवत होते फक्त आमच्या टेबल वर शांतता होती .अशी
शांतता जसी विरोधी पक्ष्याचे लोक सत्ताधारी पक्ष्याच्या लोकांसोबत जेवण करत असावेत.
जेवताना मी तिच्या समोरच असल्यामुळे तिने माझ्या बघितलं .ती बघतेय अस वाटल कि कि मी खाली ताटा कडे बघायचो अस बऱ्याचदा झाल. आणि तिने जेवताना खाली बघितलं कि तिच्या कडे बघून आणखी रागात आहे कि नाही
याचा अंदाज घ्यायचो .
पण एका एक आमची नजरा नजर शेवटी झालीच .
Do you like south Indian food? गीता ने माझ्या कडे बघत विचारलं.
sometimes. मी म्हणालो जरा गडबडत म्हणालो .
Hmmm करत गीताने जेवण संपवत पाण्याचा ग्लास घेतला.
Do you like maharashtrian food ? जेवणाचा शेवटचा घास खात मी
विचारल.
sometimes , तिने माझच उत्तर परत मला चीपकवल होत. आणि मी पण या वेळेस hmmm केल.
जेवण झाल्यावर बरेच
कर्मचारी जरा कंपनीच्या परिसरातून ५-१० मिनिट गोल चक्कर मारून आपल्या आपल्या
डिपार्टमेंट मध्ये जातात . गीता सोबत एक दोन जुने कर्मचारी आणि मी अशीच चक्कर मारून आमच्या सेल्स डिपार्टमेंट कडे
निघालो . ..गीता सगळ्यांशी व्यवस्थित बोलत होती राग गेल्या सारखा
वाटत होता.
थोड्या वेळाने आम्ही सेल्स डिपार्टमेंट मध्ये गेलो .
you joined here
for sales..right..?
तिने जरा तिरका
प्रश्न विचारलाय याची जाणीव मला झाली होती .
Sales , म्हणालो.
So, why not interested in sales thinks?
आता काय उत्तर
द्यावं मला काही समजेना , yes interested म्हंटलो तर थोड्या
वेड्या आधी मी केलेला मूर्खपणा परत गळ्याशी येइल . आणि नाही म्हणावं तर ती पुन्हा
म्हणेल मग सेल्स मध्ये जॉइन का केलं ..इकडे आड आणि तिकडे विहीर ..काय करू काही
सुचेना ...मी वरती बघत विचार करत राहिलो.
you have limited time to learn about sales properly .
don't waste time . अस
म्हणून ती तिच्या कॅबन मध्ये निघून गेली . खूप प्रोफेशनल पद्धतीने सागितलं होत .
मी ही माझ्या कॅबीन मध्ये जाऊन बसलो . विचार अंती मला हि पटल ट्रेनिंग चे दिवस खूप महत्वाचे आहेत.पुन्हा कोण्ही ते समजून सागण्यासाठी नसेल ..फक्त टार्गेट तुझ्या सोबत असेल . आणि टार्गेट पूर्ण करायची असतील तर सेल्स नॉलेज शिवाय पर्याय नाही.आता पूर्ण नीट समजून घ्यायचं असा मनाशी पक्का निश्चय केला.
काही न ज्यास्तीचा विचार न करता
थोड्या वेळाने मी गीताच्या कॅबन मध्ये गेलो . ती तिच्या
कामात नेहमी सारखी व्यस्त होती .
Gita can we discuss products sales points? तिच्या समोर उभा राहून मी
विचारलं .
मला वाटल आता परत ओरडेल पण तिने खूप छानस हसून ...why not .? म्हणून पुन्हा
एकदा मला आश्चर्यचकित केल. ती अस काही म्हणेल असा मी स्वप्नात हि
विचार केला नसेल .
तिने तिचा लॅपटॉप बंद केला आणि आमची प्रोडक्ट्स सेल्स वर बरीच चर्चा झाली . त्या बोल्यात मला कळल गीता ने MBA in Marketing केल होत. आणि खूप श्या मार्केटिंग स्किल्स वर तिची चागली पकड होती. आता पर्यत जिच्यावर माझा राग होता तो तिची बुद्धीमत्ता बघून मी केंव्हाच विसरून गेलो होतो. त्या नंतर गीताने मला खूप महत्वाच्या सेल्स ॲक्टिविटी समजून सगितल्या मी फक्त मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो आणि मान हलवत होतो . मी विचारलेला प्रत्येक प्रश्न बारकाईने विचार करून त्यांची मुद्देसूद उत्तरे ती देत होती . आता आमच्या सेल्सच्या गोष्टीनच्या चर्चे मध्ये कधी ५ वाजले कळलं पण नाही . बऱ्याच गोष्टींवर बोलून झाल्यावर . गीता थोडी निवांत होत म्हणाली . तुला आणखी या कंपनीच्या सेल्स पोलिसी बद्दल बरच शिकायचंय. सकाळ सारखा पुन्हा वागलास तर तू आणि तुझी ट्रेनिंग मला हि दुसरी भरपूर कामे असतात..थोड नाक मोरडून गीता बोलली , तिच्या चेहऱ्यावर सकाळ चा राग परत आल्या सारखा दिसत होता . आणि मी का पण कुणास ठायुक तीच राग मिश्रित बोलन शांत पणे ऐकून घेत होतो......