भाग ४ - गीतावर मनसोक्त रागवायची संधी भेटली

 आज माझा कंपनीतला तिसरा दिवस आणि गीता ने सागीतल्या प्रमाणे आज पासून माझी ट्रेनिंग चालू होणार होती त्या प्रोग्राम नुसार आज मला इलेक्ट्रोप्लेटिंग डिपार्टमेंट मध्ये आजचा पूर्ण दिवस संपवायचा होता.

सकाळीमी नेहमी प्रमणे ७.३० ला स्टोप वर जायुन कंपनी च्या बस ची वाट बघत उभा होतो. आज पासून गीता सोबत माझी ट्रेनिंग चालू होणार होती. सकाळीच लवकर जायुन कंपनी च्या कॅन्टीन मध्ये नाश्ता आटपून लगेच कामाला लागू या , गीता पण फ्रेंडली बोलायला लागली होती त्या मुळे अडचण येणार नाही खूप चागल्या प्रकारे दिवस जातील असेच विचार मनात रेंगाळत होते आणि तितक्यात फोन वाजला. HR डिपार्टमेंट चा फोन आणि सकाळी सकाळी जरा अजब वाटल.

हेलो मी फोन उचलत ..म्हणालो.

फोन वरून मला कळवण्यात आल कि बसचा काही प्रोब्लेम झाल्या मुळे कंपनी ची बस आज येणार नव्हती.

फोन पे च्या सवयीमुळे आता खिश्यात हि माझ्या कॅश पैसे नव्हते. आता करायचं काय मोठा प्रश्न माझ्या समोर उभा होता . तिथे असलेल्या रिक्षावाले आधी तर माझी भाषा समजत नव्हते वरून त्यांना फोन पे ऐवजी कॅश पैसे हवे होते.आणि रोड वरून जाणाऱ्या रिक्षा थाबत नव्हत्या . बराच वेळ मी रिक्षांना हात देत होतो  पण माझ्या प्रामणिक प्रयत्नांना यश मात्र देव देत नव्हता .

अचानक एक रिक्षा समोर आली मी तिला हात दिला आणि बघतो तर काय गीता मागच्या सीट वर बसलेली होती . आमची नजरा नजर झाली . मला वाटल चला कंपनीत जायचा प्रोब्लेम सुटला. असा विचार करत न करत होतो कि रिक्षा सरळ माझ्या समोरून भुर्रर करत निघून गेली . वाटल पुढे जायुन तरी थांबेल म्हणून मी जरा धावत पुढे आलो पण तो माझा गैसमज होता.  मी फक्त त्या रिक्षाला भरधाव पुढे जातांना बघत राहिलो. काल पर्यंत कुठली ती मदत लागली तर ये म्हणारी गीता, आज कुठली हि मदत भेटणार नाही हे अप्रतेक्ष सागंत होती .

 बऱ्याच रिक्षांना हात दिल्यावर एक रिक्षा भेटली खरी पण  त्याने मी बाहेरचा बघून मला पैश्याला चागला लुटला पण पर्याय नव्हता. इथले लोक म्हणजे माणुसकीला लागलेली मोठी कीड आहे असच मी रिक्षातून उतरत पुटपुटलो त्या रिक्षावाल्याला फोन पे करत करून कंपनीत आलो . सकाळचा नाश्ता करण्या साठी सरळ कॅन्टीन मध्ये गेलो. कॅन्टीन मध्ये रोज वेगवेगळे साउथ इंडिअन पदार्थ नाष्ट्या साठी असतात आज इडली चा नाश्ता तयार होता. प्लेट मध्ये ५-६ इडल्या घेयून मी  बसण्यासाठी टेबल कडे वळालो तर समोरच गीता बसलेली होती . पुन्हा आमची नजरा नजर झाली पण या वेळेस मी पण भाव नाही दिला. नाही तर बघितल्यावर गुड मोर्निंग म्हणायची पद्धत कंपनीत होतीच पण आज मी सरळ तिच्या समोरून कलटी मारली आणि शक्य तितक्या  लांब  कोपऱ्यात जायुन नाश्ता करायला सुरवात केली.

 नाष्टा करून कॉफी घेतली आणि माझ्या कॅबीन च्या दिशेन दिघालो पण मनात गीता बद्दलचा राग ओसंडून वाहत होता . कसली आहे हि गीता साधी माणुसकी नाही . आपण हि आता तेवढ्या पुरत तेवढ वागायचं माणुसकी आदर गेला खड्ड्यात ..अस मी पक्क ठरवलं आणि  माझ्या कॅबीन मध्ये खुर्चीवर जायुन बसलो. लॅपटॉपचालू केला पण मन काही त्यात लागत नव्हत. बाकी वेळी ठीक आहे हो पण अडचणीत असतांना कुणी आपल्याला डाव दिला ना तर भयंकर चिडचिड होते त्याला मी काही अपवाद नव्हतो.

 तेवढ्यात टेबल वरचा फोन वाजला ,

१० मिनिटांनी माझ्या कॅबीन मध्ये ये ...गीता बोलत होती नाही कदाचित हुकुम सोडत होती .
yes ma’am अस मी जरा नेहमी पेक्षा जोरातच बोललो कारण राग आलाय हे समोरच्यालाहि कळायला हव ना. फॅन चालू केला आणि थोड निवांत लॅपटॉप च्या होम स्क्रीन कडे बघत बसलो, थोड शांत झाल्यावर  विचार केला कोण हि गीता .काल परवा ओळख झालेली ते हि ऑफिस मध्ये का तिच्या कडून मी मदतीची अपेक्षा करायची हे मात्र माझ्या मनाला पटल आणि आपण हि तेवढ्या पुरत तेवढ वागायचं असा विचार करत मी गीताच्या कॅबीन मध्ये दाखल झालो .

 ती नेहमी सारखी तिच्या लॅपटॉप मध्ये गुंतलेली होती . लॅपटॉप मध्ये बघतच तिने गुड मोर्निंग केल . पण मी हि तसा दिसायला सदा भोला दिसतो पण कोनही डोक्यात गेल कि मग गेल.मी आपली डायरी उघडून त्यात बघत बसलो जस कि काय मी काही ऐकलच नव्हत . आणि गुड मोर्निंग कसली  तिने आधीच माझी बॅड मॉर्निंग केली होती .

तिने मग तिच्या नेहमीच्या स्टाईल ने मान न वळवता चासम्याच्या कोपर्यातून माझ्या कडे एक नजर टाकली आणि तेवढ्यात तिच्या टेबल वरचा फोन वाजला yes sir I am coming म्हणून तिने फोन ठेवला .

तिला sr.manager ने  सेल्स लीड्स बद्दल काही विचारयला बोलवलं आहे . अस तिने मला सागितलं आणि ती तिकडे निघून गेली.तिच्या कॅबीन मध्ये मी बसलो होतो. सगळ काही  नीट नेटक वेव्स्तीत ठेवलेलं होत . टेबल वर तिचा तिच्या फॅमिली सोबतचा एक फोटो वर नजर गेली . त्यात हि ती रागीट मुद्रेतच होती. कसली आकडू खडूस  आहेस न कळत माझ्या तोडून निघून गेल तिच्या समोर बोलायची हिम्मत तर माझ्यात नव्हतीच मग आज फोटोत मला ती नेमकी समोर सापडली होती ..मी मनसोक्त  राग तिच्या त्या फोटोवर काढला कि कुठलीच कसर बाकी ठेवली नाही अगदी इतक  कि आता मला माझ मन हलक झाल्या सारख  वाटू लागल होत....

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने