भाग ५ - माझ्या ट्रेनिंगची सुरवात


 बराच वेळ भांडलो ..पण काही भाडून मन भरत नव्हत आणि ती कधी अचानक कॅबीन मध्ये आली कळल पण नाही.

What are you saying? तिने इंग्रजी मध्ये मला अस एकट्याला बोलताना बघून विचारल .मी तिला अस समोर बघून अगदी सुन्न झालो होत. एखाद्याची चोरी पकडली जावी  ते हि सबूत के साथ” तसं माझ झाल होत .मी एकदम शांत झालो काय बोलाव समजेना ..तिने कदाचित ऐकल असाव  एका फोटोला भांडण खूप महागात पडणार याची मनोमन खात्री झाली होती .

तिने परत तोच प्रश्न विचारला.  मी नो म्हणत मान नकारार्थी हलवली .पण तिला ते माझ उत्तर काही पचल नाही.

कोणाशी बोलत होतास तिकडे बघून? परत तिच्या तामिळ टोन मध्ये तोच प्रश्न इंग्रजीत नव्याने विचारला .

नशीब मी मराठी मध्ये भाडत होतो,आणि तिला मराठी समजत नाही  हे लगेच माझ्या लक्षात आल पण तिच्या फोटो कडे बघून बोलत होतो हे मात्र तिने बघितलं असाव. आणि माझ्या बोलण्याच्या  पद्धतीवरून तिला समजल तर नसेल ना ? छे जरी समजल तरी मराठीत मी काय बोललोय ते तिला समजन तर अश्यक्यच. अस म्हणून मी जरा स्वताला सावरल.

Nothing...is this your family photo ? मी जरा हळूच बोलून तिच्या त्या टेबल वर ठेवलेल्या फोटो कडे बघत म्हणालो.

तिने त्या फोटो कडे बघितलं आणि म्हणाली ..ट्रेनिंग बद्दल बोलूयात का ? मी म्हणालो नक्कीच. विषयांतर झाल होत आणि मी सुटकेचा श्वास घेत खुर्चीवर मागे टेकून बसलो. पण आता एक आणखी खतरनाक विचार मनात आला होता. गीताला मराठी काळत नाही मग मी तिच्या फोटला भांडलो काय आणि तिला मराठीत टोमणे मारले काय तिला थोडीच काही कळणार आहे. या विचाराने मनात मात्र खुशीचे लाडू फुटत होते.. करू हे पण कधी तरी..जय मराठी....||

.तिने induction program ची प्रिंट मला मागितली मी ती तिला दिली .

थोडा मोठ्याने श्वास घेत खुर्चीला मागे टेकून बसत ती म्हणाली .

आज Electroplating department तर ?

मी हो ..म्हणत मान हलवली ..

so tell me what you know about electroplating ?  त्या पेपर मध्ये बघत तिने माझ्या कॉलेजच्या मॅडम सारख  विचारल . मला हा प्रश्न अपेशित होताच येतांना मी थोड प्रोसेस वाचून आलो होतो.

ma’am it’s a chemical process to make bonding between to material . मी सागितलं .

तिने हं अस म्हणत फोन उचलला आणि  Electroplating department डिपार्टमेंट मध्ये लावला .

Mr.sudhrappa  ,’ are you in department ?  आणि ओक म्हणून तिने फोन ठेवला .

चल निघुयात Mr.sudhrappa  आहेत.

Mr.sudhrappa   हे Electroplating department चे head साधारण ४०- ४५ वय लांब लाब मिश्या आणि डोक्यावर केसांचा थोडासा दुष्काळ असलेले तामिळ प्रेमळ वेक्तीमात्व.

 Electro plating department डिपार्टमेंट मध्ये ट्रेनिंग चालू करूयात . अस म्हणत ती खुर्ची वरून उठून कॅबीन च्या दरवाजा कडे निघाली . मी हि उठून तिच्या सोबत निघालो.

 माझी उंची जवळ जवळ ६ फूट आहे तेंव्हा तिच्या सोबत चालताना ती मझ्या कानाच्या खाली होती  साधारण ५.२ किंव्हा खूपच झाली तर ५.४ असेल. ( मला तेंव्हा कभी ख़ुशी कभी गम मधला सीन आठवला ..तारा रारा रम ...कभी ख़ुशी कभी गम. या कंपनीत आल्या पासून माझ पण तेच चालू होत कभी ख़ुशी कभी गम.या कंपनी ने माझ बागबान नको करायला फक्त  ) चला सिनिअर असली म्हणून काय झाल शेवटी माझ्या कानाच्या खालीच आहे.. हि गोष्ट हि थोडी का असेना पण मनाला सुकून देत होती. मेकॅनिकल कंपनी मध्ये पायात सगळे सेफ्टी शूज वापरतात, दिसायला ते खूप मोठे आणि जाड तसेच वजनदार असतात ते शूज गीताने पायात घातलेले होते, मी नवीन असल्या मुळे आणखी मला काही ते मिळालेले नव्हते. पण त्या शूज मध्ये हि लेडी डॉन माझ्या पेक्षा फास्ट चालत होती. तसा मी हि फास्ट चालतो पण मला अशी मुलीन सोबत चालायची सवय नव्हती त्या मुळे कदाचित मी आपला तिच्या स्पीड सोबत ऍडजस्ट करत होतो. पण याची अभय तुला आता सवय करावी लागेल ..स्वतःशीच पुटपुटलो.

 गीता सोबत चालताना मात्र तिच्या मोगर्याच्या फुलांचा छान सुवास येत होता .त्या पुढे मी लावलेला महागडा परफ्युम हि फिका पडला होता. आता पर्यत या फुलांना मी कधीच विशेष महत्व दिल नव्हत पण आज माझ्या हातात असत तर राष्ट्रीय फुलांचा दर्जा देयून मोकळा झालो असतो. थोड्यावेळात आम्ही Electroplating department मध्ये पोहचलो .. मध्ये जाताच सगळे गीता ला गुड मोर्निंग करत होते . ती हिसगळ्यांना मोर्निंग ..म्हणून रिप्लाय देत होती .

 गुड मोर्निंग गीता ? समोर सुन्दरप्पा  उभे होते , 

sir , he is abhay , new joined in company ? अस म्हणून तिने त्यांच्याशी तामिळ मध्ये बोलायला सुरवात केली. आणि दोघे हि तामिळ मध्ये बोलायला लागले. मला तर काही समजत नव्हत पण दोघांपैकी कुणी हसल कि मी हि हसायचो.आणि ते बोलताना थोडे शांत झाले कि मी हि थोडा धीरगंभीर पणा चेहऱ्यावर आणायचो.कळत तर काही नव्हत पण काही तरी उगाच शांत उभा राहण्या पेक्षा ..थोड्या वेळ असाच गेला ..पण त्याचं तामिळ बोलन काही संपेना ..पण नुसतच हसून धीरगंभीर होन मला  आता आता मला काही जमेना  डोंबाऱ्याच्या खेळ सगळा . अर्थातच माझ नौटंकी माकड झाल होत माझ.  म्हणून मी मधेच बोलायला सुरवात केली .

sir , can you show me Electroplating process?

दोघांनी माझ्या कडे बघितलं जस काही वेगळच केल्यावर डोंबारी माकडा कडे जरा वेगळ्या नजरेने बघतो अगदी तसं . कदाचित माझ मध्ये बोलन त्यांना अपेशित नसाव ........

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने