वेळ - मराठी कवीता

 कवितेबद्दल :

वेळ  मराठी कवीता | wel marathi kavita | time marathi poem | heart touching marathi kavita on time 


वेळ
शुभ ही अशुभ ही असते
सुख पण आणते,दुःख पण देते
चेहऱ्यावरची खुशी पण असते
अन डोळ्या मधल पाणी पण असते
कधी थकत नाही कधी संपत नाही
निरंतर चालू असते हो तीच वेळ असते ..
 
भूतकाळ तून वर्तमान संपवत भविषाकडे धावत असतेMoney-Time-Hamster-Wheel-Caught-Everyday-Life-5443957.pngना कुठला थांबाना कुठंला मार्ग
तिच्यात ना माया ना गर्व
पण संपतो दिवस ,होते रात्र
काल जे होत ते आज ,
आठवणींचा स्टरेज मध्ये बदलून जाते
ते स्टोरेज ही की एक दिवस भरून जाते
निरंतर चालू असते हो तीच वेळ असते ..
 
बालपण ...जवानी ...म्हातारपण
वेळच भान देत जाते,
कॅलेंडमधील तारिख रोज जूनी होत जाते.
कित्येक कॅलेंडर मग रद्दित विकले जातात
वर्षभराच्या दिवसांचे फक्त बाराने येतात
तरी ही नवीन कॅलेंडरचे जगात स्वागत असते
निरंतर चालू असते हो तीच वेळ असते. .
.
वेळ ही खूप चतुर असते
न सांगता कधी पण येते
संकटात टाकून निघून जाते
ओळख आपल्याला आपली खरी तेंव्हाच होतें
जेंव्हा संकटावर आपली जीत होते
तेंव्हा चेहऱ्यावर जी खुशी दिसते..हो ती वेळ असते
 
वेळच गणित कधी कुणाला कळाल
सोडवायला गेलो कित्येकदा
पण पुन्हा वेळेन रूपच बदललं
तसे बदल मी माझ्यात ही केले
तू बदलला म्हणून काही रागवून सोडून गेले
पण जे उरले ते आपले होते
वेळ बऱ्याच गोष्टी शिकूवून जाते
आस्तिक ला नास्तिकनास्तिक ला आस्तिक बनून जाते
तुमच्यात जे बदलते ती वेळ असते ..
निरंतर चालू असते हो तीच वेळ असते ..
अभय शेजवळ
३०-४-२०२१

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने