आपण न कळत अशी काही नाती दुर्लक्षित करत असतो जी आपल्या आयुष्यात खूप महत्वाची असतात पण आपल लक्ष कुठे दुसरी कडेच असत.
अशीच खूपशी किमती नाती आपण गमावतो पण त्याचा पश्चाताप जेंव्हा होतो तेव्हा डोळ्यातील अश्रू हि त्या पुढे कमी पडतात आणि न काळत वाटून जात...काश आपण ती नाती सच्च्या मानाने जपली असती ..!
आपण तर नात्यातील दोरा धरून बसलोत त्यातील मोती म्हणजे त्या प्रिय वेक्ती त्या दोऱ्यातून तुटून एक एक केंव्हा हरवून गेल्यात कळल पण नाही .
पण तेंव्हा असा पश्चाताप होवू न काहीच फायदा नसतो वेळ जी कुणासाठी थांबत नाही ती केंव्हाच निघून गेलेली असते ..आणि आपण जेंव्हा त्या प्रिय वेक्तींचा शोध घेतो तेंव्हा ते आपल्या नजरे समोर नसतात याची जेंव्हा जाणीव होते तेंव्हा होणारा तो त्रास शब्दात मांडण अश्याक्यच..
त्या मुळे आपल्या प्रिय वेक्तीना तळहाताच्या फोडा सारख जपा ...हे आयुष ..काल हो ना हो सारखाच आहे ..आपण काल असू किंव्हा नसू ..पण आपण नेहमीच आपल्या प्रिय वेक्तीच्या मनात असतील ...
Tags:
Marathi kavita