पाऊलखुणा मराठी कविता |marathi poetry on love | marathi poem on love |prem marathi kavita

paulkhuna marathi kavita |पाऊलखुणा मराठी कविता| पाऊलखुणा मराठी | तुझ्या पाऊलखुणा | marathi poetry on life| marathi poetry on love | marathi poem on love | marathi poem |prem marathi status | prem marathi kavita

कधी -कधी असच होत  मी चालताना एकटा असतो .पण कुणी तरी सोबत चालत आहे अस नेहमीच जाणवत . पण मला ती अनोळखी अदृश चहूल कधी भीतीदायक वाटलीच नाही .

कधी कधी मी त्या अदृश शक्तीसोबत बोलायचा हि प्रयत्न केला आणि जाणवलं कुणी तरी आपलच आहे कदाचित मागच्या जन्मच कोण्ही सोबती ....


पाऊल खुणा 

माझा नेहमीच पाठलाग करत कुणी
मझ्या संगेच असत कुणी प्रत्येक क्षणी
दिसत नसल तरी भासत मनोमनी
पण नक्कीच असत कुणी तरी

मी एकटाच असतो चालतांना
पण चाहूल जाणवते कुणाची तरी
सुन्या सुन्या त्या वाटेवरी
खरच असत कुणीतरी

त्या वाटेवर अचानक थांबतो मी
बघतो सगळ्या बाजूंनी
मोठ्याने म्हणतो आहे का कुणी
तेंव्हा बोलत कुणी मुक्या शब्दांनी
असच घडत पावलोपावली
अन जेव्हां वळून बघतो मी माघारी
तेंव्हा मझ्या पाऊलखुणा माझ्याच असतात
पण त्या संगे पाऊल खुणा असतात कुणाच्या तरी

                                                                                                  अभय शेजवळ 


paulkhuna marathi kavita |पाऊलखुणा मराठी कविता| पाऊलखुणा मराठी | तुझ्या पाऊलखुणा | marathi poetry on life| marathi poetry on love | marathi poem on love | marathi poem |prem marathi status | prem marathi kavita | Abhay shejwal poetry
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने