heart touching mother love poem in marathi | काल त्या ट्रेन मध्ये | emotional marathi poem

 त्या दिवसाचा तो ट्रेन ( railway) चा प्रवास मी कधीच विसरू शकत नाही . गरिबी संपली असे म्हणणारे हजारो  भेटतील पण त्या पेक्षा ज्यास्त आज हि पाण्याने पोट भरणारे दिसतील  . अशीच हि एका मुलाची आणि आईची कथा .

ट्रेन मध्ये प्रवास करत असताना ती आई मला आपल्या लेकराच्या  भुकेमुळे व्याकूळ  झालेल्या चेहऱ्या कडे बघून कासावीस झालेली .....  आणि तो इतकासा मुलगा पण कसल कमालीच शहाणपण ...तो हि आईला न सागता पाणी पियुन पियुन आपली भूक  संपवण्याचा केविळवाना प्रयत्न करत  होता पण आई ती आईच असते .....तिला ते सगळ काळत होत पण तिच्या कडे त्याच्या साठी काही खायला घ्यायला पैसे नव्हते..तिची ती मनस्थिती आज हि प्रगती केलेल्या भारताला नक्कीच एक वेळ लाजवेल .......


मुंबई पुण्याच्या प्रवासात काल घडलेला हा प्रसंग खरंच कायम लक्षात राहील. त्यावर लीहलेली ही छोटीशी काविता.


!!!... काल त्या ट्रेन मध्ये.....!!! | heart touching poem in marathi | mother poem


माझ्या परतीच्या प्रवासात
ट्रेन मधल्या त्या डब्ब्यात
उपाशी बसलेलं ते ईवलस मुल
येणाऱ्या जाणाऱ्या वडापाव वाल्याकडे
व्याकुळ होऊन बघत होत
प्रत्येक सटेशन वर पिण्याच पाणी पुन्हा पुन्हा भरत होत....!!..
शेजारी बसलेली आई
सगळं काही बघत होती..
त्याच्या डोक्यावरून हात फिरवत
लेकस साठी झुरत होती.....
डोळ्या मधल्या पाण्याला पापण्यांन जवळ थांबवत
फाटक्या पदराने. ते पुन्हा पुन्हा पुसत होती.....
त्याची ती तळमळ बघून
पिशिवी मधला बिस्कीट चा पुडा त्याचा हाती ठेवला
आणि म्हटलं त्याच्या आईला
भुकेला पाण्याने संपवता आल असत तर
किंमतच नसती राहिली..गांधी असलेल्या नोटला.......
ती. बघत राहिली
दुःख मनातलं सांगत राहिली
एका छोट्याश्या खेड्यातली ती..
मन भरून बोलत राहिली
आम्ही बुलेट ट्रेन चे स्वप्न बघतोय
आणि ती वेडी भाकरीची चिंता करत राहिली......
शेवटी मी पुण्यात उतरतो
उतरताना त्या इवल्याश्या पोराला.. काही पैसे देत
त्याने नको नको करत असताना ही मी म्हटलं
'तुझ्या मामा कडून ही छोटी सी भेट "
तितक्यात ट्रेन पुणे सोडून निघाली
आणि त्याने ट्रेनच्या खिडकीतून Bye bye मामा..म्हणून दिलेली हाक
खरंच मला ...खूप भाऊक करून गेली.......
अभय शेजवळ
२०-१२-२०१८



same topics

emotional marathi poem

emotion poem examples

marathi kavi

marathi poetry on life

आयुष्यावर कविता

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने