sairat movie poem | मराठी कविता सैराट | sairat movie story points | sairat movie message |sairat meaning

 sairat movie poem | मराठी कविता सैराट |  sairat movie story points | sairat movie message |sairat meaning | sairat meaning in marathi | heart toching poem on caste system

सैराट हा चित्रपट येयून खूप दिवस झालेत पण त्यातील जातीयतेचा विषय आज हि तितकाच ज्वलंत आहे . आज हि देशाच्या कुठल्या ना कुठल्या कण्या- कोपर्यात सैराट झाल्याच्या बातम्या आज हि काही नवीन नाहीत .

पण अस का होत ? आज हि जाती -पाती च्या वर आपण का बघत नाही कि आज हि समाज काय म्हणेल ..जात बंधू काय म्हणतील याचाच विचार अंतर जाती विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या कुटुंबाला सतावत असतो .

काळाच्या ओघात आपण खूप पुढे आलोय पण या जातीच्या चक्रातून आपली काही सुटका होत नाही किंव्हा आपणच ती करू इच्छित नाही अस म्हणायला हि हरकत नाही .सैराट याच विषयावर एक झनझनीत अंजन आपल्या डोळ्यात घालतो .आता पर्यत हा चित्रपट सगळ्यांनीच बघितला असेल . आपण फक्त बघून आपण सोडून देणार आहोत कि त्यायून काही घेयून सुधारणावादी होणार आहोत ? ....



तू जिंकलास नागराज...!!

हा हा हा.........

तू जिंकलास नागराज तू जिंकलास

गालावर हसू बनून

आणि त्याच डोळ्यातलं पाणी बनून

मी हि रडलो होतो

तू हि रडलास...

मी हरलो होतो....

तू मात्र जिंकलास

तू जिंकलास नागराज तू जिंकलास.....


तू जिंकलास.........

कारण मी मन भरून रडलो काल

अंधारातल्या त्या खोलीत

नशीब त्या अश्रुना रंग नाही

भावनांना कुटल्या अत्तराचा गंध नाही

मग माणसातल्या सैतानाचा येणारा तो जातीयतेचा घाणेरडा वास

याला का रे अंत नाही.


तू जिंकलास...

कारण तुला सिनेमा करता येतो

मनाला सारा गोतावळा

जगा समोर मांडता येतो

पण आम्ही काय करायचं रे

तू तर मोकळा झालास सार सांगून...

आम्ही वाहतोय ओझ जातीच नाव घेवून


तू जिंकलास .........

स्वताला परश्यात बघून आमच्यातला परश्या केंव्हाच मेला

त्या अर्चिला आवडलेला

उरलाय फक्त प्रिन्स

संवेदना हरवलेला......


तू जिंकलास.......

साऱ्या महाराष्ट्राला नाचायला लायून

पण तू खरा जिंकलास

माझ्या सारख्याच्या डोळ्यात पाणी आणून

तुझी जातीच्या भिंतीच्या पारची गोष्ट

मित्रा देवून गेली एक वेगळाच मोक्ष

वारे गड्या त्यात साखर ठेवलीस चवीला

पण मिरची ची पूड हि होती

डोळ्यात काजळ म्हणून लावायला


तू जिंकलास......

कारण दगडी झालेलं मन हि तू माझ्याच अश्रुनी ओल करून गेलास

पण तू हे खूप वाईट केल गड्या

जाता जाता..

त्या दगडाला लागलेला जातीचा रंग हि तू पुसून गेलास

अरे आता कस जगायचं ओळख नसल्या सारखं

किती विचित्र बोलतोय ना मी

पण प्रश्न बिकट आहे मित्रा

तू सांगत राहा तुझी कथा

आम्ही फक्त दाखवत राहतो अश्रू

आणि तुझ्या साठी वाजवत राहतो टाळ्या...!!!!..

अभय शेजवळ.../ abhay shejwal poem


sairat movie poem | मराठी कविता सैराट | sairat movie story points | sairat movie message |sairat meaning | poem on caste | famous poems on caste system

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने