मराठी कविता ऑफिस चा कोपरा | office prem kavita in marathi | एकतर्फी प्रेम कविता |marathi prem kavita |

 office love story |  in marathi  | office love | office prem kavita in marathi | एकतर्फी प्रेम कविता | marathi prem kavita | prem kavita in marathi | marathi kavita on love


प्रत्येक ऑफिस मध्ये एक असा कोपरा नक्कीच असतो तिथे आपल्या नजरा परत परत जातात ... असा कोपरा जो मना मध्ये घर करून जातो ..सकाळी सकाळी त्या कोपऱ्या कडे एक नजर मारून झाल्या शिवाय सकाळ चा चहा ...दुपारच जेवण आणि संध्याकाळ चा नाश्ता गळया खाली उतरत नाही ....




ऑफीसचा एक कोपरा


ऑफीसचा एक कोपरा जिथे असतो सुंदरसा

एक चेहरा हसरा, पुन्हापुन्हा तेथेच का ? वळतात माझ्या नजरा....!!!

तो चेहरा सुंदर रे असला

मनात बसला

प्रत्येक smile नंतर क्षण हि .. क्षणभर थांबला....!!


रोज सकाळी जेंव्हा बघतो मनात गोधळ उडतो

सावरतो न सावरतो स्वतःला शेवटी विचार बुडतो

विचारातून हा तिढा अलगत सुटतो मनातून अवाज येतो

अभय मृगजळ हे कश्याला धावतो..!!!


मग नजरेला रोखतो

धाक हि दाखवतो

त्या दिशेला धोका आहे

नजरेला समजून हि सागतो

पण अप्पुन साला त्या धोक्यात पुन्हा पुन्हा का ? सापडतो..!!


थंड चहा पितांना

दोन तीन गाणे अर्धे अर्धे गातांना

पुन्हा office च्या कामात गुंतून जातो..

office चा तो कोपरा रोज असाच आठवणीत राहून जातो ...

रोज असाच आठवणीत राहून जातो....!!!!

अभय शेजवळ


 office love story |  in marathi  | office love | office prem kavita in marathi | एकतर्फी प्रेम कविता | marathi prem kavita | prem kavita in marathi | marathi kavita on love

सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने