balpan marathi kavita | बालपण मराठी कविता | माझी कंपासपेटी मराठी कविता | Archana's Marathi poem

 अर्चना बागुल गायकवाड | Archana Bagul Gaikwad |  Archana's Marathi poem |Marathi kavita |



Archana bagul gaikwad poem , Archana's Marathi poem , Marathi kavita.balpanichya kavita,



माझी कंपासपेटी

पहाताच तिच्याकडे तिने मला भूतकाळात नेले

शाळेचे दिवस सुंदर माझ्या आठवणीत आले 

 उडाला तिचा रंग,  चढला तिजवर गंज

पट्टी  तुटली, पेन्सिल हरवली, कंपास ने तर मान टाकली 

कोणमापक केंव्हाच टिचले, करकटक मला बोचले

आठवले काही प्रश्न जे होते मनात साचले 

जुनी झाली माझी पेटी तिच्या वस्तूही झाल्या जुन्या 

त्यात होत्या आणखी एक जोडी त्याला म्हणतात गुण्या

पट्टी, पेन्सिल चा संसार दहा वेळेस मोडला

खोडरबर, शार्पनर ने तर कधीच प्राण सोडला
 
बरेच दिवस त्या पेटीची गाठ दप्तराशी बांधली
 
ती जोडी मात्र पेटी मध्ये गुण्या गोविंदाने नांदली 

त्याचा नेमका उपयोग काय कधीच नाही कळला 

 भूमितीचा नी माझा मेळ कधीच नाही जुळला 

                - अर्चना बागुल गायकवाड 

 अर्चना बागुल गायकवाड | Archana Bagul Gaikwad |  Archana's Marathi poem |Marathi kavita | Marathi poetry 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने