हरवलेलं बालपण | childhood days Marathi poem |childhoodfriend | बालपण मराठी कविता

 Archana bagul gaikwad poem , Archana's Marathi poem , Marathi kavita.balpanichya kavita, 




Archana bagul gaikwad poem , Archana's Marathi poem , Marathi kavita.balpanichya kavita,


हरवलेलं बालपण - मराठी कविता 

मी पाहिले ते दिवस,
जेंव्हा कोणाकडेच नव्हता फोन
टेलिफोन च्या बूथवर लांबचलांब गर्दी असायची
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक काळजी एक हुरहूर दिसायची
बोलता बोलता कंठ ही दाटून यायचा
दिसत नव्हतं म्हणून काय झालं
सगळा मायेचा प्रवास शब्दागणिकचं व्हायचा ll

मी जगले ते आयुष्य,
जेंव्हा कोणाच्याच घरात नव्हता टीव्ही
असेल एखाद्याच्या घरी तर घोळक्याने गर्दी व्हायची
रंगात यायचे सगळे अन
टीव्हीची मालकीण टीव्ही चं बंद करून द्यायची
हिरमोड व्हायचा आमचा पण आम्हीही होतो निर्लज्ज
पुन्हा टीव्ही बघण्यासाठी आमची स्वारी सज्ज
काय मान काय अपमान कशाचंच नव्हतं भान 
तो घोळका  ती गर्दी सगळं कसं होतं छान ll

मी अनुभवले ते दिवस,
जेंव्हा आम्ही ही होतो शाळेत
धिंगाणा मस्ती करूनही
अभ्यास व्हायचा वेळेत
ना मोबाईल ना इंटरनेट संवाद साधायचो थेट
मॅगी, पिज्जा,  बर्गर असं काहीच नव्हतं लागत
शिळ्या भाकरी सोबतही होतं आमचं भागत ll
        
                                     -   अर्चना बागूल गायकवाड 
                                  

  - Archana bagul gaikwad poem , Archana's Marathi poem , Marathi kavita.balpanichya kavita, 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने