मराठी कवीता नशीब | marathi kavita nashib | poetry in marathi

                 जीवन म्हंटल कि सुख दुखांचा खेळ हा चालूच असणार ..सुखा शिवाय दुःखाची किंमत कधीच कळू शकत नाही. आपण नेहमीच सुखाच्या शोधात इतके गडलेलो असतो कि कधी कधी न कळत मनाला वाटून जात कि जितक पण दुखः जगात आहे ते सगळच कदाचित आपल्या वाट्याला आलय...

कुठे तरी मी ऐकल होत , माणूस काही तरी ध्येय घेयून जन्माला येत असतो .प्रत्येक जन्म का काही न काही शिकवण देत असतो. त्या दिव्यातून जे पार करत पुढे चालत जातात ते त्यांचे ध्येय प्राप्त करतात . त्या मुळे सुख दुखाच्या खेळला एका खेळाडू ऋत्तीने सामोरे जाण्यात जी गंमत आहे ती कदाचित आपल्या अवती भवती असणाऱ्या कुठल्या हि खेळात नाही .

नशीब हा त्या खेळातला  मुख्य घटक ...कधी कोण्ही म्हंटल कि " मला भविष्य बघता येत " तर न कळत आपला हात त्याच्या समोर असतो ..पण खरच त्या रेषा भविष्य सांगू शकतात का ? हे तर एक न सुटणार कोढ आहे . पण मी हात दाखवून मन करमणूक नक्की करून घेत असतो .... 

बाकी काही असो पण ......नशिबाच्या नावान चांगभलं............... 





मराठी कविता नशीबा

कधी मागितलं नाही काही

म्हणून काय तू द्यायच विसरून गेलास आणि जे दिल

त्या पेक्षा ज्यास्त घेऊन गेलास

खरंच तू आहेस का

की भ्रम आहे सगळा

हातावरच्या रेषा फक्त रेषा असतात की असतो त्यात अर्थ वेगळा

आणि असेलच त्यात तू "नशीबा"

तर आजच

मिटवतो त्या रेषा ना

ज्यांनी खूप सतवलय

खुशी चेहऱ्यावर असताना........

स्वप्न.. आशा अपेक्षा

यांचा असा गुंता झालाय

आणि त्यात मी अडकलो असा

की आता श्वासही घेणं अवघड झाला पण नशिबा तुला लिहणारा

ही कधी भेटलाचं मला

तर मी विचारेल तुम्हाला सूचलीच कशी इतकी अप्रतिम sad कथा ....

तरी पण "नशीबा"

मी तुला दोष देतोय तरी कश्याला जेथे जवळचे अंतर ठेऊन आहेत तू तर सोबत तरी आहेस

माझ्या प्रत्येक कडू क्षणाला प्रतेक कडू क्षणाला.............

अभय शेजवळ २३/३/२०२१


सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने