मराठी कवीता कॉफी | cafe marathi kavita | Best friend marathi poem

 




मराठी कवीता कॉफी | Best friend marathi poem

सवय नाही तशी
कुणाची वाट बघायची .... 
पण हॉटेल चा त्या कॉर्नेर ला
एकटाच कॉफि ची जुंनी टेस्ट एन्जोय करत 
सोबत तिच्या जुन्या आठवणी
आणि सिगरेट क्या धुक्यात हरवलेला मी..!!
शुद्ध तेंव्हा आली
जेंव्हा तिने आवाज दिला..
अरे कॉफि धंड झालीय.. आणि तू कुठे हरवलाय
मी शांत पणे तिच्या कडे बघत
धंड कॉफि एका दमात पिऊन मोकळा झालो 
तिने वीचित्र नजरेनं बघता
म्हटलं सवय झालीय.....
आता पण तू समजली तसी नाही.....
ती हासली ..मी ही......
फक्त फरक इतकाच होता
ही मनापासून हसली.. आणि मी.. वरवर
खूप दिवस झाले भेटला का नाहि,
हसून म्हणालो हा वेळ त्या वेळ सारखा नाही
लग्न केल्यावर लोक बदलतात मी म्हटलं.. 
बदलत नाही कुणी
पण बदलायला भाग पाडतात
आयुष भांगर. होत .. जेंव्हा कुणी असूनही
फक्त त्या भांगरवर चमकती smile चीपकून
फक्त खुश व्हायचं असत
तिने कॉफि पित हातावर हात ठेवला
चूक बरोबर माहीत नाही
पण मनोमन थोडा आधार वाटला
नाही तरी या मतलबी दुनियेत
नात्यांचा शोधत हा जीव तसा ही खूप भटकला
पण आज ..जुन्या आठणींमध्ये.. तच्यिा सोबत... कॉफि तर होता बहाणा
पण तिच्या मनमोकळ्या बोलण्याने
हा जीव खरंच खूप सुखावला ....
अभय शेजवळ
22-07-2020
सॉफ्टवेअरफुकट

प्रथम मराठी जणांना "जय महाराष्ट्र" मराठी माणसांना हा ब्लॉग अर्पण करतांना मला फार आनंद होत आहे. संगणक सॉफ्टवेअरची माहिती सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळाल्या मुळे मराठीमाणसांना ती उत्तम प्रकारे कळेल .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने