आपण सगळेच जवळ जवळ नोकरी करणारी मानस..पण जी लोक कमी शिकलेली असतात त्याची नोकरी हि एक सजा असल्या सारखी मला वाटते ..आपल्या पेक्षा हि खूप मेहनतीचे काम ते करतात तरी .."सुख म्हणजे काय असत " हे त्यांना माहितच नाही .
दिवसभर उन्हा तान्हात मर-मर मारायचं त्यातून हि फक्त कुटुंबाच्या दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न सुटतो . या वर उपाय काही असेल तर शिक्षण ...
महात्मा जोतीबा फुले , सावित्रीबाई फुले यांनी जे योगदान शिक्षणाच्या बाबतीत दिले ते कधीच विसरून चालणार नाही आणि त्यांचा वसा पुढे नेयुन बाबासाहेब आंबेडकर यांनी मुलभूत शिक्षणाचा अधिकार दिला त्या तून आजचा भारत स्वाभिमानाने उभा आहे .......
कर्मवीर भाऊराव पाटील सारखी मानस आपल्या महारष्ट्रात जन्माला आली याचा नेहमीच पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत राहिला आहे ....
मराठी कवीता -नौकरी | marathi kavita- naukari
हि नोकरी रे तुझी
अशी कशी
ओढ माझी
लपवू कशी....
तुला बोलाव
करावी थोड़ी मस्करी
पण तू वैतगलेला
चढताच ऑफीसची पाहिरी....
तुझ ऑफीस ना
बंदी शाळा
कवरेजच नसत मग
आपल्या प्रेमाला......
मी हसलो
आकाशाकडे बघत
तुला काय सांगू सखे
हि नोकरी ..नोकरी कहाणी पोटासाठी पहिली येथे मी
माणस जिवंतपणी मरणारी...................
आकाशाकडे बघत
तुला काय सांगू सखे
हि नोकरी ..नोकरी कहाणी पोटासाठी पहिली येथे मी
माणस जिवंतपणी मरणारी...................
इथे कुणी नसत कुणाच
रक्तच वाहत घाम होऊन
बघणारे फक्त बघत राहतात
नको तितक्या जखमा देऊन...........
येथे मोठे मोठे होतात
बाकीच्यांच्या हाताला फक्त फोडे येतात...
तरी हसून बोलतांना बगितली मी येथे मानस
धन्यवाद देवा
डोळ्यातली आसवे तरी लपवता येतात ..
शेवटी थकतो तो
आयुष्याच ओझ वाहून
काय करणार करून
त्याच दावणीला पोराला लाउन
हळू हळू पणतीची वात संपते ग जळून
येथे असाच चालतो संसार
उपासी पोटी
कितेक पहिली
मी मानस फक्त पाण्यावरती जगणारी......
हा असाच चालणार खेळ
कि धांबणार कुठे तरी
उन सावलीच्या खेळा मध्ये तरी
उन तर असतच पण कधी तरी
असतेच ना सावली.....
शेवटी थकतो तो
आयुष्याच ओझ वाहून
काय करणार करून
त्याच दावणीला पोराला लाउन
हळू हळू पणतीची वात संपते ग जळून
संपते ग जळून....
संपते ग जळून....
आयुष्याच ओझ वाहून
काय करणार करून
त्याच दावणीला पोराला लाउन
हळू हळू पणतीची वात संपते ग जळून
संपते ग जळून....
संपते ग जळून....
अभय शेजवळ....
Tags:
Marathi kavita